चेन्नई : महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून आला, पण आयपीएल 2025 च्या 25 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. ज्यामुळे आपल्याच घरात मैदानावर चेन्नईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे संघ पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. सहाव्या सामन्यात चेन्नईचा पाच पराभव आहे. चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सकडून 8 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.
चेन्नई सुपर किंग्ज IPL मधून बाहेर?
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 6 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. त्यांना आणखी 8 सामने खेळायचे आहेत, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान 7 सामने जिंकावे लागतील. जे कुठेतरी अवघड दिसत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
धोनीचे शेर केकेआरपुढे ढेर…
या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुनील नरेनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि सीएसकेला 20 षटकांत नऊ गडी गमावून 103 धावांवर रोखले. सीएसकेकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा काढल्या, त्याने 29 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार मारले आणि 31 धावा केल्या. केकेआरकडून नरेनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, मोईन अली आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन फलंदाज शुन्यावर तर…
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांचे सलामीवीर 16 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतले. सीएसकेसाठी कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. संघाकडून विजय शंकरने 29, राहुल त्रिपाठीने 16 आणि डेव्हॉन कॉनवेने 12 धावा केल्या. त्याच वेळी, पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही, तर दोन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.
क्विंटन डी कॉक आणि नरेनचा तडाखा –
लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरने क्विंटन डी कॉक आणि नरेन यांच्या मदतीने चांगली सुरुवात केली आणि दोन्ही फलंदाजांनी 25 चेंडूत 46 धावा केल्या. पण, कंबोजने केकेआरला पहिले यश मिळवून दिले आणि डी कॉकला आऊट केले. डी कॉक 16 चेंडूत तीन षटकारांसह 23 धावा काढल्यानंतर बाद झाला. यानंतर, नरेनने आक्रमक खेळी केली आणि केकेआरचा स्कोअर काही वेळातच 85 धावांवर पोहोचला. नरेन अर्धशतक झळकवण्याच्या जवळ होता, पण त्याला नूरने बोल्ड केले. त्यानंतर रिंकू सिंग मैदानात आला, ज्याने कर्णधार अजिंक्य रहाणेसह संघाला विजय मिळवून दिला.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12015/


