हैदराबाद : आयपीएलच्या 27 व्या सामन्यात हैदराबादच्या मैदानावर धावांचा पाऊस पडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 245 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादनं 8 विकेटनं आणि 9 बॉल बाकी ठेवत विजय मिळवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं केलेल्या वादळी फलंदाजीमुळं पंजाबच्या गोलंदाजीची धूळदाण उडाली. अभिषेक शर्मानं 141 धावा केल्या तर ट्रेविस हेडनं 71 धावा केल्या.
हैदराबादला सलग 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आजच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. आता हैदराबादचा संघ गुणतालिकेत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे.
अभिषेक शर्माने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानात पंजाब किंग्सवर धमाकेदार विजय मिळवला आहे. हैदराबादने विक्रमी 246 धावांचा यशस्वी पाठलाग करत या मोसमातील सलग 4 पराभवानंतर पहिला आणि एकूण दुसरा विजय नोंदवला आहे. हैदराबादने हे आव्हान 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. हैदराबादने यासह पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. अभिषेक व्यतिरिक्त ओपनर ट्रेव्हिस हेड यानेही या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. हेडने 66 धावांची खेळी केली.


