सावंतवाडी : अमरावती जिल्हा कुंभार समितीच्या वतीने ॲड . प्रा.. जी. एम. शिरोडकर यांना नुकताच समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला .गेली चाळीस वर्षे कुंभार समाज उत्कर्ष साठी त्यांनी दिलेले योगदान .अनेक वर्ष जिल्हा संघटने त उपाध्यक्ष म्हणून केलेलं काम त्याच प्रमाणे ५ वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून केलेले काम.समाजाला एकत्रित करून व त्यांना विविध सरकारी योजनांचं मिळण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न .समाजाला जागृत करण्यासाठी केलेले काम यांची दखल घेऊन अमरावती जिल्हा कुंभार संघटनेने त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.त्या अनुषंगाने संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गने कुडाळ येथे प्रा. शिरोडकर यांचा सत्कार केला.यावेळी गोवा राज्य कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष श्री. हरमलकर, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्रचे उपाध्यक्ष यशवंत शेडुलकर, प्रदेश सरचिटणीस विलास गुडेकर, जिल्हा अध्यक्ष प्रा.नारायण साळवी, उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर उद्योजक, सचिन हरमलकर, सावंतवाडी महिला अध्यक्ष माधवी भोगण, कुडाळ अध्यक्ष आनंद पाटकर, श्री. पाटकर व कुंभार समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गतर्फे ॲड. प्रा. गणपत शिरोडकर यांचा सत्कार.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


