नवी दिल्ली : अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्सनं सुपरओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. सुपरओव्हरमध्ये राजस्थाननं 11 धावा केल्या होत्या. दिल्लीला विजयासाठी 12 धावा करायच्या होत्या. दिल्लीच्या केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी केवळ चार बॉलमध्येच 13 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. आयपीएलमध्ये 1500 दिवसानंतर सुपर ओव्हर पाहायला मिळाली. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सनं अनुभव पणाला लावत दिल्लीला विजयापर्यंत नेऊन पोहोचवलं. दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा शिल्पकार मिशेल स्टार्क ठरला. त्यानं 20 व्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या. तर सुपर ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या.
टॉस जिंकलेला असल्यानं सुपर ओव्हरमध्ये राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी केली. शिमरन हेटमायर आणि रियान पराग राजस्थानकडून फलंदाजीसाठी उतरले.
राजस्थानची फलंदाजी –
शिमरन हेटमायर : 0,4,1,1
रियान पराग : 4
यशस्वी जयस्वाल : धावबाद
इतर : 1,
मिशेल स्टार्क :
पहिला बॉल : 0
दुसरा बॉल : 4
तिसरा बॉल : 1
चौथा बॉल (नो बॉल) : 4
चौथा बॉल : धावबाद
पाचवा बॉल : 1 + धावबाद
शिमरन हेटमायरला पहिल्या बॉलवर एकही रन काढता आली नाही. त्यानं दुसऱ्या बॉलवर चौकार मारला. तिसऱ्या बॉलवर हेटमायरनं एक रन घेतली. यानंतर रियान पराग फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आला. रियान परागनं पहिल्याच बॉलवर चौकार मारला.साईड लाईनवरुन बॉल टाकला गेल्यानं बॉल नो दिला गेला. यानंतरचा बॉल मिशेल स्टार्कनं तो परागला मारता आला नाही. रन उशिरा धावल्यानं रियान पराग धावबाद झाला. यशस्वी जयस्वाल देखील रनआऊट झाल्यानं दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 12 धावांची गरज आहे.
विजयासाठी 12 धावांची गरज असताना दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेल यानं केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या अनुभवी खेळाडूंना फलंदाजीसाठी पाठवलं.
दिल्ली कॅपिटल्स –
केएल राहुल : 2, 4 , 1
स्टब्स : 6
संदीप शर्मा : 2,4,1,6
दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स 12 धावांचं आव्हान पार करत विजय मिळवलं. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानावर –
दिल्ली कॅपिटल्सनं आता सहापैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत एकूण 10 गुणांच्या जोरावर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. नव्या कॅप्टनच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्सनं दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. मिशेल स्टार्कनं आजचा सामना राजस्थानच्या हातातून खेचून आणला. मिशेल स्टार्कनं त्याचा अनुभव आजच्या मॅचमध्ये पणाला लावल्याचं दिसून आलं.


