सावंतवाडी : श्री देव इस्वटी रेडकरवाडी येथे ३ मे रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमासोबतच रात्री ९ वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ मोरे कुडाळ यांचा ‘वेडा चंद्रहास’ या पौराणिक नाटकाचा प्रयोग रंगणार आहे.
या नाट्य प्रयोगात श्री. आनंद कोरगावकर, श्री. बाळू कोचेरेकर, श्री. संतोष गावडे, श्री. रोशन शिरोडकर, कु. रोहित नाईक, श्री. शैलेश महाडगूत, श्री. रामचंद्र शेटकर, श्री. सुयेकांत पवार, श्री. शंकर वाळके हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. त्यांना हार्मोनियमवर कु. आशिष तवटे, मृदुंगावर कु. पियुष खंदारे आणि तबल्यावर श्री. राजू तुळसुलकर साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम रेडकरवाडी-मळगांव येथे होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचा आनंद घेण्यासाठी मंडळातर्फे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.


