पणजी : गोव्याच्या शिरगाव येथून मोठी बातमी समोर आली आहे. यात शिरगाव मधील प्रसिद्ध श्री लईराईच्या जत्रोत्सवामध्ये रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर साधारण 70 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच त्यांनी बिचोली रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता बळावली आहे. मात्र ही चेंगराचेंगरी नेमकं कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12262/


