संजय पिळणकर.
वेंगुर्ला : सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगारातर्फे दि १ मे २०२५ पासून आगाराच्या गेटवर अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात व संबंधितांची तात्काळ बदली करण्या संदर्भात आमरण उपोषण सुरु होते,आज शनिवार दी.३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रद्नेश बोरसे यांच्या सोबत चर्चा करून दि.१५ जुन पूर्वी संबंधित अधिकारी यांची बदली करण्यात यावी तसेच सदर वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या कडून संघटनेच्या सभासदांना कोणत्याही प्रकारे त्रास देण्यात आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा स्वरूपाचे लेखी पत्र उपोषणकर्ते यांना देण्यात यावे अश्या सूचना देण्यात आल्या, सदर बाब विभाग नियंत्रक यांनी मान्य करून सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला यांना तसे लेखी पत्र दिल्याने तीन दिवस चालू असलेले आमरण उपोषण दि.३ मे रोजी स्थगित करण्यात आले.

उपोषण कर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई,भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोकजी राणे,तसेच पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार यांनी मोलाचे सहकार्य केल्याने संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
सदर उपोषण स्थळी उपोषण मागे घेण्या संदर्भात लेखी पत्र देताना,भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब तसेच माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर विभागीय अधिकारी,श्रीमती दळवी मॅडम, विक्रम देशमुख,निलेश लाड,आगार व्यवस्थापक राहुल कुंभार उपस्थित राहून उपोषणकर्ते विभागीय सचिव भरत चव्हाण,आगार सचिव दाजी तळवणेकर,विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत,विभागीय सदस्य महादेव भगत तसेच उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले आगार उपाध्यक्ष सखाराम सावळ यांना देखील रुग्णालयात जावून लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.


