सावंतवाडी : नुकत्याच जाहीर झालेल्या एच एस सी परीक्षेत आरोंदा कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचा कॉमर्स शाखेचा निकाल 100% टक्के लागला आहे.
प्रशालेची विद्यार्थिनी संजना रंगनाथ मातोंडकर ही 72.33% गुण मिळवून प्रथम आली आहे, सुनंदा उमेश कांबळी ही विद्यार्थिनी 68% गुण मिळवून द्वितीय आली आहे तर साक्षी संजय नाईक या विद्यार्थिनीने62.17% गुण संपादन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच तन्मय देवदत्त नाईक हा रिपीटर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे .एकूण 6 पैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ज्युनिअर कॉलेजचा सन 2024 /2025 चा निकाल 100% टक्के लागला आहे याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे ,आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदेश परब ,सचिव भाई देऊलकर, खजिनदार रुपेश धर्णे तसेच सर्व कार्यकारणी सदस्य तसेच आरोंदा हायस्कूलचे व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षिका सौ रिया धर्णे, सौ विद्या कौलापुरे व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
आरोंदा कला, वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी कॉमर्स शाखेचा १००% निकाल!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


