नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवन या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटून मोठा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय धवनने आपल्या समाजमाध्यम खात्यांवरून जाहीर केला आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसी अशा सर्वांचे आभार मानत धवनने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.


