Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कबड्डी स्पर्धेत कळकवणे क्रीडा मंडळ विजेता तर काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता ! ; राधाकृष्णवाडी टेरव यांचे आयोजन.

चिपळूण : श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत, राधाकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा गुरुवार ८ मे ते शनिवार दिनांक १० मे २०२५ या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रिडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर संपन्न झाली. सदर स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात आल्या. एकूण २० संघानी सदर स्पर्धेत भाग घेतला. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक अजित आबाजीराव कदम, टेरवच्या उपसरपंच सौ. रिया राकेश म्हालीम व वाडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेस विजेत्या संघास रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात आले.

१. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या अंतिम विजयी संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणाचा श्री अजित वसंतराव कदम यांसकडून रुपये रोख ₹. १०,००० व आकर्षक चषक,

२. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या अंतिम उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री सुहास (नंदू) दत्तात्रयराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांस कडून रोख ₹.७५०० व आकर्षक चषक,

३, ४ केदारनाथ, आडरे व केदार वाघजाई, कोळकेवाडी या दोन्ही उपांत्य विजय संघास प्रत्येकी ₹. ५,००० व आकर्षक चषक कै. रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रघुनाथराव कदम व कै. महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ श्री निलेश महादेवराव कदम यांसकडून देण्यात आले.

५. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या संघाचे श्री राकेश मोडक यांस उत्कृष्ट चढाई पटू म्हणून कै. अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू,

६. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री सोहम कदम यांस उत्कृष्ट पकडी करिता कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील मानसिंगराव कदम,

७. तसेच कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री संकेत घडशी यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कै. दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विनय दीपकराव कदम,

८. तर कुलस्वामिनी धामणवणे (उंडरेवाडी) या संघास शिस्तबद्ध संघास कै. राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट खेळाडूस कूलरही भेट देण्यात आला. सदर बक्षिचांचे वितरण सर्वश्री दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, अजितराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार, गोपीचंदराव, अनिलराव, संभाजीराव, अनंत साळवी, अशोकराव, भाऊराव, विश्वासराव, अशोकराव या मान्यवरांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १० मे, २०२५ रोजी करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांसाठी २५ सन्मानचिन्हे कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार मेहनत घेतली. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहाय्य करून संस्थेस उपकृत केले.

सदर संघाच्या वृक्षाचे, वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी गेली पन्नास वर्षे कैलासवासी हणमंतराव, काशीरामराव, उद्धवराव, वसंतराव, दत्तारामराव, पर्वतराव, पांडुरंगराव, दत्तात्रयराव, सखारामराव, भाऊराव, जगन्नाथराव, बाबुराव या व इतर अनेक सद्गृहस्थानी अपार कष्ट घेतले. सध्या राधाकृष्ण साधनालय संघाचे कार्य पुढे नेण्याचे काम सर्वश्री धोंडजीराव, रघुनाथराव, दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, संभाजीराव, भाऊराव, विश्वासराव, बाळकृष्णराव, अशोकराव, गोपीचंदराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार व शहरातील व वाडीतील सर्व लहान थोर ग्रामस्थ व तरूण वर्ग एकत्रितपणे करत आहेत. राधाकृष्ण मंदिरात, वाडीत होणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदान एकत्र पणे साजरे करण्यात येतात.

कबड्डी स्पर्धेस आलेल्या अंदाजे ₹ १,५०,००० खर्च वाडीतील सर्व लहान थोर मंडळींनी सढळहस्ते सहकार्य करून उचलल्याबद्दल आम्ही सर्व तरुणवर्ग व बांधवांचे आभारी आहोत . सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिरीष पांडुरंगराव कदम, ओंकार (बाबू) अशोकराव कदम, प्रशांत अनंतराव मोरे, विनय दीपकराव कदम, राजेश मारुतीराव कदम व ओम अविनाशराव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धेचे नियोजन व समालोचन श्री चंद्रकांत शंकरराव मोरे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएनचे मा.जेष्ठ पदाधिकारी यांनी उत्तम रित्या पार पाडले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles