Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

चाकरमान्यांच्या हितासह पारपोली गावाच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत! ; पारपोली ग्रामविकास मंडळाच्या कार्यक्रमात गोपाळ गावकर यांची ग्वाही.

सावंतवाडी : पारपोली गावातील मुंबईस्थित चाकरमान्यांचे पारपोली ग्रामविकास मंडळ गावातील चाकरमान्यांसाठी आधारवड ठरले असून मुंबईत राहूनही पारपोली ग्रामविकास मंडळ आपल्या गावाच्या प्रेमापोटी पारपोली गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात गेली २५ वर्षे योगदान देत आहे. मंडळाची ही सामाजिक बांधिलकी यापुढेही सुरू राहणार असून पारपोलीवासियानीही संघटीत राहून गावाचा विकास साधावा असे आवाहन पारपोली ग्रामविकास मंडळाचे सचिव गोपाळ गावकर यांनी केले.

मुंबईस्थित चाकरमान्यांच्या पारपोली ग्रामविकास मंडळाच्या पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मंडळाच्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्यात गोपाळ गावकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पारपोली गावचे प्रमुख शिवराम परब, पारपोली ग्राम विकास मुंबई मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम, खजिनदार रामचंद्र गावकर, उप खजिनदार सुनिल तेजम, सहसचिव समिर परब, सल्लागार उदय गावकर, मंडळाचे चिटणीस विश्वनाथ गावकर, पांडुरंग गावकर, सदस्या सौ गितांजली गावकर, सौ रेश्मा बिर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम यांनी गोपाळ गावकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मंडळाच्या २५ वर्षातील कार्याचा आढावा घेत मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली असून यापुढेही पारपोली गावातील चाकरमान्यांसह पारपोली गावासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी चाकरमान्यांना संघटित करण्यासह मंडळाच्या २५ वर्षाच्या जडणघडणीत गोपाळ गावकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांची लाभलेली उत्तम साथ कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच मंडळाच्या माध्यमातून पारपोली गावात राबवलेल्या अनेक उपक्रमांसह कार्याचे कौतुक करून मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंडळाच्या या कार्यक्रमात भेट देऊन पारपोली ग्रामविकास मंडळाला २५ वर्षे होत आहेत हे सर्वांसाठी अभिमानस्पद असुन
मंडळाच्या २५ वर्षाच्या कार्यातील सातत्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे कोकणातील मुंबई मंडळांनी आदर्श घ्यावा असे या मंडळाचे आदर्शवत कार्य l असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाच्यावतीने संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडीतील शुभम क्रिएशनचे शुभम धुरी, इन्सुली येथील श्रीदेवी माऊली दशावतार नाट्य मंडळाचे मालक सचिन पालव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी मंडळाच्या सौ गितांजली गोपाळ गावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम शुभम धुरी यांच्या बहारदार निवेदनाखाली उत्तरोत्तर रंगत गेला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातील विजेत्या महिला सौ केतकी अर्जुन अहिर, दीपिका दत्तगुरु गुरव, सौ रेश्मा उमेश बिर्जे, शितल बिर्जे, सौ ममता गवस, सौ रसिका गावडे यांना पैठणीची साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पारपोली ग्रामविकास मंडळाच्या २५ वर्षातील कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारा व मोठ्या पडद्यावर दाखवीण्यात आलेल्या छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे नियोजन गोपाळ गावकर, गोविंद तेजम, रामचंद्र गावकर, सुनिल तेजम, विश्वनाथ गावकर, समीर परब, पांडुरंग गावकर, सौ गितांजली गोपाळ गावकर, अर्जुन अहिर यांनी केले होते. या कार्यक्रमाला पारपोलीवासीयांसह मंडळाचे सर्व सदस्य व चाकरमानी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ गावकर, सुत्रसंचालन समीर परब यांनी तर आभार दत्तगुरु गुरव यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles