Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

Big News – पाकिस्तानसाठी हेरगिरी, ठाण्यातून तिघे ताब्यात ! ; ‘ATS’ ची मोठी कारवाई.

ठाणे :  पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या तपास संस्थांनी पाकिस्तानी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय. मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हीदेखील त्यापैकीच एक आहे. दरम्यान, आता याच तपास संस्था आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या महाराष्ट्रातील तिघांना एटीएसने पकडले आहे. घरभेद्यांना पकडण्याच्या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थांना हे मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे. या तिघांपैकी दोघांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. सध्या एक आरोपी एटीएसच्या ताब्यात असून त्याची कसूनच चौकशी केली जात आहे.

भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप –

मिळालेल्या माहितीनुसार दहसतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने महाराष्ट्रातून एकूण तीन कथित हेरांना पकडले आहे. त्यांनी भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. हे तिन्ही आरोप पाकिस्तान इन्टेलिजेन्स ऑफिसच्या (पीआयसी) संपर्कात होते, असा एटीएसला संशल आहे. तसेच 2023 साली झालेल्या देशविरोधी कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग होता, असे बोलले जात आहे.

भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला दिली – 

या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या आरोपींनी एका पाकिस्तानी महिला एजेंटने फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये फसवलं. त्यानंतर तिने भारताविषयीची गुप्त माहिती मिळवली. एटीएसच्या सांगण्यानुसार नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या काळात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारताची सैन्य संरचना तसेच इतर महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे.

दोघांना चौकशीनंतर सोडून दिलं –

ठाण्यातील एटीएसने गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. आरोपीसोबत इतर दोघांनाही एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. भविष्यात त्यांना पुन्हा एकदा बोलवलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितिनुसार अटक करण्यात आलेली व्यक्ती मुंबईच्या एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत होती.

महिला नागपुरात आली, मात्र…

दरम्यान, नागपूरची एक महिला एलओसी क्रॉस करून पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने तिला परत भारताकडे सोपवले. आता ही महिला तिच्या घरी नागपुरात आली आहे. मात्र तिने तिचा मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट केला आहे. त्यामुळे तपास संस्थांचा संशय बळावला आहे. देशातील वेगवेगळ्या तपास संस्था आता तिची चौकशी करणार आहेत.

 

ADVT –

https://satyarthmaharashtranews.com/12262/

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles