रत्नागिरी : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धीमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.

श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.
यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल, कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, दै. महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, वरिष्ठ पत्रकार अरविंद (अण्णा) कोकजे, राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्य श्रीमती जान्हवी पाटील, कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रणव पोळेकर, मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वळंजू, जिल्हा अध्यक्ष अनंत ताफेकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मेहरुन नाकाडे, सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव, अलिबाग प्रेस क्लब असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव निलेश पानमंद, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहार संघाचे कोषाध्यक्ष विनोद यादव, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन (महाराष्ट्र) चे अध्यक्ष उदय जाधव, रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे, दीपक दळवी, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक खान यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


