सावंतवाडी : बारामतीत शारदानगर येथे ४ थे राज्यस्तरीय ‘अक्षर संमेलन’ संपन्न झाले. ‘माझी शाळा माझा फळा समुह’ आणि ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट’ (बारामती) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातील ‘सोहळा अक्षरांचा सन्मान कलेचा’ या अक्षर सोहळ्यात सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलचे कला शिक्षक योगेश गावित यांना ‘फलक लेखन ‘ कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने’ महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संमेलन स्वागताध्यक्षा, विश्वस्त एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, सौ. सुनंदाताई पवार, संमेलनाध्यक्ष तथा सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,महाराष्ट्र राज्य तथा प्रशांत साजणीकर तसेच ४ थे अक्षर संमेलनाचे सर्वस्वी कर्ताकरविता सगळ्यांचे लाडके नेतृत्व अक्षरतज्ज्ञ, रांगोळीकर या कार्यक्रमाचे संयोजक अमित भोरकडे सर, तथा ज्येष्ठ चित्रकार संतोष लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
योगेश गावित यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


