Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा जहाजाचे लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे !

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून रत्नागिरीच्या मिऱ्या किनारी गेली सहा वर्षे लाटांचा मारा खात ‘बसरा स्टार’ जहाज एकाच जागी अडकून पडलेले आहे. समुद्राच्या येथील किनाऱ्यावर धडकणाऱ्या अजस्त्र लाटांचा मारा सातत्याने होणाऱ्या जोरदार तडाख्याने आता या जहाजाचे दोन तुकड्यात रुपांतर झाले. लाटांमुळे जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने हे जहाज आता भग्न झाले आहे.
हे जहाज मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकलेले हे जहाज काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डामार्फत त्या जहाजाच्या मालकाला येथील प्रशासनस्तरावरून मुदतही देण्यात आली. ती मुदत टळून गेलेली असतानाही ते जहाज काढण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन या भंगारात गेलेल्या जहाजाची विनाविलंब मोडणी करण्यासाठी गुंतलेले होते. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या 1200 मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा कामाचा टप्पा शिल्लक आहे. त्या बंधाऱ्याच्या कामात या अडकलेल्या जहाजाचा व्यत्यय निर्माण झालेला आहे.
मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे. परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. पण त्या कामासमोर अडकलेल्या त्या बसरा स्टार जहाजाची मोठी अडचण उभी आहे. हे जहाज आता भंगारात गेल्याच्या स्थितीत उभे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात गेलेले जहाज येथील पर्यटनाचे केंद्र बनलेले होते. कारण त्या जहाजाच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पडणाऱ्या रिल्समुळे ते जहाज पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटकांची दरदिवशी तेथे वर्दळ वाढलेली होती. त्यामुळे लगतच्या स्थानिकांनाही रोजगाराचे साधन निर्माण झाले होते. पण आता खवळलेल्या समुद्राच्या धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे या जहाजाला मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्या जहाजाचे दोन तुकडे झाल्याची स्थिती सद्या पहायला मिळत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles