विजयपुरा : कर्नाटकमधल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनेरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडला आहे. बँकेतून ५२ किलो सोन्याची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात असलेल्या कॅनेरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडला आहे. ६ ते ८ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असल्याचा पोलिसांना संशय आहे. चोर बनावट चावी बनवून बँकेत शिरले होते. चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. तसंच ते व्हिडीओ रेकॉर्डर देखील सोबत घेऊन गेले. त्यानंतर बँकेच्या लॉकरमधून या चोरांनी ५२ किलो सोनं चोरलं. इतकंच नाही तर ही चोरी झाल्यावर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली आहे. चोरीला गेलेल्या या ५२ किलो सोन्याची किंमत ५१ कोटीहून अधिक आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासातल्या मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा मानावा लगेलं.


