Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनांतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न. ; भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन.

सावंतवाडी : आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा भोसले अभियांत्रिकी महाविद्यालय, सावंतवाडी आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

एकूण सहा दिवसांची ही कार्यशाळा पहिले तीन दिवस ऑनलाइन स्वरूपात आणि उर्वरित तीन दिवस प्रत्यक्ष उपस्थितीत संपन्न झाली. उद्घाटन सी-डॅकचे संगणक शास्त्रज्ञ डॉ.आशिष कुवेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वालचंदचे डॉ.उमेश चव्हाण यांनी ‘हाय परफॉर्मन्स कंप्युटिंग आणि एआय’ या विषयाची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच यामागील राष्ट्रीय धोरण, शैक्षणिक योगदान व औद्योगिक गरजांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान उद्योगातील आधुनिक तंत्रप्रणालींचा परिचय, शैक्षणिक संशोधनाची दिशा आणि इंडस्ट्री ४.० मधील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ वक्ते म्हणून आयआयटी मुंबईचे डॉ.ऋषिकेश जोशी, आयआयटी गोवाचे डॉ.शरद सिन्हा, डॉ.शीतला प्रसाद, सीओईपी, पुणेचे डॉ.अमित जोशी, सी-डॅकचे डॉ.कार्तिक नारायण, डॉ.जयश्री पवार, डॉ.हिमांशू शर्मा, एसपीआयटी, मुंबईचे डॉ.सुधीर ढगे उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून कॉम्प्युटर, कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले होते.

प्रशिक्षण कार्यक्रम भारत सरकार पुरस्कृत होता. सहभागी उमेदवारांना एचपीसी क्लस्टरवर विनामूल्य प्रयोगांची संधी, प्रवास भत्ता तसेच निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, वालचंदचे संचालक प्रा.डॉ.यु.ए.दबडे, नोडल सेंटर प्रमुख प्रा.डॉ.डी.बी.कुलकर्णी, भोसले टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व वालचंदचे प्रा.डॉ.यु.बी.चव्हाण उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना एनव्हिडीया उद्योगमान्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles