सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत केले.
या भेटी दरम्यान जिल्ह्यातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. डॉ. मोहन दहीकर यांनी नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी संदेश पारकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत अधीक्षक दहीकर यांचे लक्ष वेधले.


