सावंतवाडी : संदीप गावडे यांचा प्रत्येक कार्यक्रम नाविन्यपूर्ण राबवत असतो. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर खरोखर तत्परतेने कार्यक्रम राबवून तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्यांची खासियत आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले. आजचा कार्यक्रम हे सुध्दा त्याचेच एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथने याचे उदाहरण घेऊन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणारा कावळेसाद पॉईंट आता फ्लाॅअर व्हॅली पॉईंट म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन वर्षात तो रंगीबेरंगी झाडा फुलांनी सजलेला दिसणार आहे. भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष म्हणजे संकल्प सोडल्यानंतर अवघ्या काही तासात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थिती या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या प्रकारची तब्बल 100 हून अधिक रोपे या भागात लावण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, आंबोली आर एफ ओ, सावंतवाडी पोलीस निरीक्षक,वनस्पती तज्ज्ञ निखिल कुलकर्णी,बाबा काणेकर, मनोज नाईक, रवी मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, केसरी उपसरपंच संदीप पाटील, प्रदीप दळवी, दया परब, अनिकेत आसोलकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाला आंबोली चौकुळ गेळे आदी भागातील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी श्री. गावडे म्हणाले या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या नेहमी गजबजणाऱ्या कावळेसाची एक वेगळी ओळख निर्माण होईल. यासाठी आम्ही ‘फ्लॉवर व्हॅली पॉईंट’ हा उपक्रम राबवला आहे. तसेच येथे लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची आणि देखभालीची जवडबदारी देखील आम्ही घेणार आहोत. भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून ‘एक झाड मातृभूमीसाठी’ या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात कावळेसाद पॉईंट हा रंगीबेरंगी झाडा फुलांनी भरलेला दिसेल. त्यामुळे पर्यटन दृष्ट्या त्याचा आणखी महत्त्व वाढणार आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे उपक्रम परिसरात लावण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या या भागाचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.


