दिनविशेष – वैदिक पंचांगानुसार, आज 10 जून 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?
आजचे राशीभविष्य –
मेष रास –
मेष राशीच्या लोकांनो आज हमखास एखादी गोष्ट हक्काने जवळच्या व्यक्तींकडून करून घ्याल.
वृषभ रास –
वृषभ राशीच्या लोकांनो आज सभोवतालच्या लोकांना जास्तीत जास्त आनंद द्याल, एकंदरीत चांगल्या गोष्टीची नांदी आज कराल
मिथुन रास –
मिथुन राशीच्या लोकांनो आज भावंडां बरोबर मतभेद झाले तर, त्याची कारणे न समजल्यामुळे थोडेसे गोंधळून जाल.
कर्क रास –
कर्क राशीच्या लोकांनो आज खूप काही करायची उर्मी मनामध्ये बाळगाल, त्यामुळे नोकरी धंद्यात aडकलेली कामे उत्साहाने मार्गी लावाल
सिंह रास –
सिंह राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल महिलांनी थोडा तापटपणा ताब्यात ठेवावा
कन्या रास –
कन्या राशीच्या लोकांनो आज संतती सौख्य मिळेल, मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल
तूळ रास –
तूळ राशीच्या लोकांनो आज कुठे काय बोलावे, त्यांना कळल्यामुळे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास –
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला सामावून न घेतल्यामुळे मनातून जरा खट्टू व्हाल
धनु रास –
धनु राशीच्या लोकांनो आज काही बाबतीत थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर समाधानी राहाल
मकर रास –
मकर राशीच्या लोकांनो आज मित्र-मैत्रिणीच्या सहवासात रमून जाल, व्यवसायात भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येईल
कुंभ रास –
कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी इतर पर्यायांकडेही लक्ष द्यावे लागेल, कधी कधी धरलं तर चावत आणि सोडलं तर पळतं अशी ही अवस्था होऊन जाईल
मीन रास –
मीन राशीच्या लोकांनो आज सर्व ठिकाणी समतोल राखावा लागेल, नाही त्या गोष्टींमध्ये अडेल तट्टूपणा केला नाही तर फायद्याचे ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून सत्यार्थ न्यूज कोणताही दावा करत नाही.)


