Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चिपळूणच्या धामेली गावातील अपर्णा महाडिक यांचे आकाशातले शेवटचे उड्डाण! ; गुजरात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू.

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुनबाई आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात झेपावलेली एक जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ कन्या हरपली आहे.
अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले.
त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत कार्यरत आहेत. अपर्णा यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांत आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांची विनम्र, समजूतदार आणि व्यावसायिकतेची ओळख असलेली ही धडाडीची महिला अचानक हरपल्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे.
धामेली गावातही या बातमीने शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
या दुर्दैवी घटनेवर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटले, “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”
हा अपघात केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठीच मोठी धक्का देणारी घटना ठरली आहे. अपर्णा महाडिक यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles