अहमदाबाद : अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त झाले आणि यात 204 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एक प्रवासी आश्चर्यकारक बचावला आहे. एक महिलेचे विमान मिस झाल्याने ती सुदैवाने बचावल्याचे उघडकीस आले आहे. आता विमान दुर्घटनेतील मृत्यूमुखी पावलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या विमान अपघातात लंडनला फिरायला निघालेल्या दोघा बहिण -भावांचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या विमान अपघातात उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहिण- भावाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. हे दोघे बहिण- भाऊ लंडन फिरायला निघाले होते. त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्दैवी शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुले आहेत. शुभ आणि शगुन हे महिनाभराच्या सुट्टीवर लंडनला फिरायला निघाले होते.


