Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे ७४ धावांची आघाडी.

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया व दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होत आहे. पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडवून दिली. 212 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण अफ्रिकन संघाला 138 धावांवर रोखलं. तसेच पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपल्याने उर्वरित तीन दिवसात या कसोटीचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 250 हून अधिक धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करणं दक्षिण अफ्रिकेला कठीण जाईल. आता या स्पर्धेचं जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे राहतं की दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरतं हे सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज फेल गेले. एडन मार्करमला तर खातंही खोलता आलं नाही. रायान रिकल्टनने 16 धावा, वियान मुल्डर फक्त 6 धावा करून बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमाने त्यातल्या त्यात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार काही यश आलं नाही. त्याने 84 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारून 36 धावा केल्या. डेविड बेडिंघमने मधल्या फळीत चांगली खेळी केली. एकीकडे विकेट पडत असताना एका बाजूने डाव सावरला. त्याने 45 धावांची खेळी केली. दुसरीकडे, काइल वेरियन्ने 13 धावा, तर मार्को यानसेनला खातंही खोलता आलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये धावचीत होणं हा खरा तर गुन्हा असतो. केशव महाराज मोक्याच्या क्षणी धावची होत तंबूत परतला.

दक्षिण अफ्रिकेकडून पॅट कमिन्सने जबरदस्त गोलंदाजी केली. दक्षिण अफ्रिकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवलं. पॅट कमिन्सने 18.1 षटकात 28 धावा देत 6 गडी बाद केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणार पॅट कमिन्स हा आठवा गोलंदाज ठरला आहे. तर मिचेल स्टार्कने 2 आणि जोश हेझलवूडने एक गडी बाद केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles