सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न.
सावंतवाडी : शहरातील श्रीराम वाचन मंदिर येथेकोकण व गोव्यात प्रवेश परीक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील इयत्ता दहावीमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विविध शाळांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आलेल्या सुमारे ८० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. नकुल पार्सेकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, टाटा मोटर्स, पुणे येथील प्रोजेक्ट मॅनेजर सौ. ममता परब, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब, आणि परफेक्ट अकॅडेमीचे डायरेक्टर प्रा. राजाराम परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. राजाराम परब म्हणाले, “बुद्धिमत्ता ही दुर्मिळ असते, पण योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे सिंधुदुर्गातील विद्यार्थी पुणे, सांगली, कोल्हापूरकडे वळतात. मात्र, परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही पुणे-मुंबईसारख्या गुणवत्तेचे प्रशिक्षण फक्त २५% शुल्कात सिंधुदुर्गात उपलब्ध करून देणार आहोत.”
ते पुढे म्हणाले की, गेली सहा वर्षे त्यांनी सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयआयटी, नीट, एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे काम सुरू ठेवले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच एक शैक्षणिक क्रांती उभी करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन परफेक्ट अकॅडेमीच्या सावंतवाडी शाखेचे अमोल खरात व त्यांच्या टीमने केले. यामध्ये स्वाती कांबळे, पूर्वी जाधव, शितल कांबळे मॅडम, फातिमा मकानदार व सोनाली जाधव यांचे विशेष योगदान होते.
—


