Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दक्षिण अफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ! ; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चोकर्सचा डाग पुसला.

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं आहे. या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला होता. पण दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं. पण तळाच्या फलंदाजांनी झुंजार फलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे दुसऱ्या डावात हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला काही गाठता येणार नाही असंच क्रिडाप्रेमींना वाटत होतं. कारण लॉर्ड्सची खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. पण दक्षिण अफ्रिकेने असाध्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवून दाखवली. दक्षिण अफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के बसले होते. मात्र इतक्या मोठ्या धक्क्यानंतर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी झुंजार खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे विजयश्री जवळ आला. तिसऱ्या दिवशीच दक्षिण अफ्रिकेने 2 बाद 213 धावांची खेळी केली होती. चौथ्या दिवशी फक्त 69 धावांची गरज होती आणि हा विजय दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात असेल. झालंही तसंच.. दुसऱ्या दिवशी तीन विकेट गमवून दिलेलं लक्ष्य गाठलं.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 282 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेला अवघ्या 9 धावा असताना पहिला धक्का बसला. रायन रिकल्टन अवघ्या 6 धावा करून तंबूत गेला. त्यानंतर आलेल्या वियान मुल्डरने एडन मार्करमसोबत 61 धावांची भागीदारी केली. वियान मुल्डर 27 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे हा सामना हातून गेला असंच वाटत होतं. पण एडन मार्करम आणि टेम्बा बावुमा यांनी चिवट खेळी केली. एडन मार्करमने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. तसेच टेम्बा बावुमाची त्याला उत्तम साथ लाभली. त्याने अर्धशतकी खेळी करत विजयश्री खेचून आणला.

दोन्ही संघात कसा झाला सामना?

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार टेम्बा वाबुमा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 212 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या 138 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी होती. या धावांसह दुसऱ्या डावात खेळताना 73 धावांवर 7 गडी तंबूत होते. मात्र त्यानंतर एलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क यांनी तळाशी येत झुंजार खेळी केली. तसेच संघाला दुसऱ्या डावात 207 धावांपर्यंत पोहोचवलं. पहिल्या डावातील आघाडी आणि दुसऱ्या डावातील 207 धावा असं अधिक करून 281 धावा झाल्या. तसेच विजयासाठी 282 धावांचं आव्हानं दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या डावात सहज गाठलं.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles