Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मोदी सरकारच्या गौरवार्थ व्यावसायिक आणि बुद्धिजीवी जनतेचे कणकवलीत संमेलन ! ; गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढावा.

कणकवली : मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते.
या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक, वकील, व्यापारी, शेतकरी, आंबा -काजू बागायतदार, महिला भगिनी अशा शेकडो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यासोबतच बुद्धिजीवी लोकांना सोबत घेऊन त्यांचे विचार जाणून घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांनी नाम. नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टी यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या भाषणाने झाली. त्यांनी थेट श्रोत्यांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे लोकांना समजून सांगितले आणि सोबतच प्रदर्शनी पाहण्याचे आवाहन केले. मोदी सरकारमुळे गेल्या अकरा वर्षात जगात भारताची प्रतिमा उंचावली याची अनेक उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणात दिली.
वकिल,व्यापारी शिक्षक वर्ग, अभियंते शेतकरी यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले , आभार प्रदर्शन संयोजक मनोज रावराणे यांनी केले. व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस लखमराजे भोसले, संयोजक मनोज रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर आदि उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles