Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

न्यायासाठीच्या लढ्यात पूर्ण ताकदीनिशी दोडामार्गवासियांच्या पाठीशी उभा राहणार. – युवा नेते विशाल परबांचे अभिवचन!

  • दोडामार्ग तालुक्याचा विकास खुंटवणारी इको सेन्सेटिव्ह झोनची चुकीची अंमलबजावणी घातक – 
  • दोडामार्ग येथील लाकूड व्यापारी शेतकरी संघटनेच्या बैठकीत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केली भूमिका स्पष्ट.

दोडामार्ग : तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन अनावश्यक रित्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. एकूण ३६ गावे असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील १२ गावे इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये येतात. परंतु सरसकट सर्वच तालुक्यात इकोसिन्सिटीव्ह झोन लावला गेल्याने त्याचा फटका पूर्ण दोडामार्ग तालुक्याच्या विकासाला बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बागायतदारांना त्यांचा दैनंदिन जीवन चरितार्थ चालवणे अशक्य झाले आहे. याविरुद्ध शेतकऱ्यांनी दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र व राज्य शासनाने दोडामार्ग तालुक्यातील फक्त चौदा गावे इकोसिंसेटीव्ह झोन मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे.

याची तातडीने दखल घेऊन इको सेन्सिटिव्ह झोन समाविष्ट असलेली १२ गावे सोडून इतर गावातील सरसकट लागण्यात आलेली बंदी उठवण्यात यावी, अन्यथा दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायतदारांना व्यावसायिकांना प्रकल्पग्रस्तांना व इतर व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांना एका मागोमाग एक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी वेदनादायी व्यथा या बैठकीत लाकूड व्यापारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्याकडे मांडली.

यावेळी झालेल्या बैठकीत श्री.विशाल परब यांनी गटचर्चा आयोजित करून प्रत्येकाशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या व्यावसायिक व व्यक्तिगत अडचणींबाबत मार्गदर्शन केले. चुकीच्या पद्धतीने लादला गेलेला इकोसिनसिटिव्ह झोन रद्द केल्यानंतर उर्वरित सर्व गावात छोट्या मोठ्या अनेक पायाभूत सुविधा रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणता येतील तसेच जांभा दगड खडी वाळू उत्खनन परवानगी टप्प्याटप्प्याने मिळेल व रोजगार निर्मिती होईल, असे मत श्री विशाल परब यांनी व्यक्त केले.

रोजगार निर्मितीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करता याव्या, पर्यटनासह सर्व उद्योगधंद्यांना वाव मिळावा यासाठी या गावातील निष्कारण असलेली बंदी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने उठवली जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासन दरबारी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रसंगी वेळ पडल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्र चव्हाण साहेब व खासदार नारायण राणे साहेब यांच्याशी आपणा सर्वांची चर्चा घडवून निश्चितपणे मार्ग काढला जाईल न्यायालयाचा आदेश स्पष्ट आहे तरीही कायदेशीर लढाई लढावी लागणार असेल तर मी सक्षमपणे तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहीन अशी स्पष्ट ग्वाही श्री विशाल परब यांनी यावेळी दिली. लवकरच हा चुकीचा इको सेन्सिटिव्ह झोन उठेल आणि विकासापासून वंचित राहिलेलो आपण सर्व दोडामार्गवासीय विकासाचा बॅकलॉग भरून काढून पुन्हा विकासाकडे झेप घेऊ, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला श्री विशाल परब यांचे समवेत ॲड अनिल निरवडेकर, दोडामार्गचे माजी भाजपा तालुकाध्यक्ष श्री रंगनाथ गवस, लाकूड व्यापारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रीतम पोकळे, सचिव श्री.ऋषिकेश धरणे, श्री वैभवजी सुतार, पोलीस पाटील श्री तुकाराम देसाई, निवृत्त शिक्षक श्री देसाई सर, सर्व लाकूड व्यापारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles