सावंतवाडी : तंत्रज्ञातंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात होत आहे.संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१ जून रोजी होत आहे .
शिक्षणाचे अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे आज शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग विभाग कविता शिंपी यांच्या शुभहस्ते तसेच अन्य उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन होणार आहे. हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या स्मार्ट क्लासरूममध्ये AI-शक्तीवर चालणारे शिक्षण ॲप्लिकेशन्स आणि डिजिटल संसाधने यांचा समावेश असेल यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक, वैयक्तिकृत आणि प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे. AI तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येईल, त्यांच्या गरजा ओळखता येतील आणि त्यानुसार शिक्षणात बदल करता येतील. या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.
ADVT –


