सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी शहर मंडल यांच्या वतीने नुकतीच संकल्प ते सिद्धी मंडळ कार्यशाळा हॉटेल मँगोच्या सभागृहात उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांमध्ये केलेल्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे मुख्य वक्ते म्हणून भाजपचे राष्ट्रीय प्रदेश कार्यकारणी सदस्य पुखराज पुरोहीत, जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा खानोलकर व महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीवर सखोल माहिती दिली. अँड.संजूजी शिरोडकर यांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी, माहिती पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आले, ज्यामुळे मोदी सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे झाले. या कार्यशाळेमुळे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आणि विकासाच्या संकल्पाला आणखी बळकटी मिळाली.

सदर कार्यशाळेस या वेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, सावंतवाडी शहर सरचिटणीस आनंद नेवगी, भाजप ओबीसी जिल्हा सदस्य दिलीप भालेकर,सावंतवाडी शहर मंडल महिला अध्यक्षा सौ.मोहीनी मडगांवकर,जिल्हा महिला चिटणीस मिसबा शेख,माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर, माजी नगरसेवक राजू बेग, सावंतवाडी शहर मंडल महिला सरचिटणीस मेघना साळगांवकर,ओ.बी.सी शहर मंडल अध्यक्ष अमित गवंडळकर, प्रभाग अध्यक्ष कुणाल शृगांरे, नागेश जगताप, सॅबी फर्नाडिस, गणेश कुडव सुमित वाडकर,मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, मेघा भोगटे,मेघा सावंत, सुकन्या टोपले, ज्योती मुद्राळे ,अन्विशा मेस्ञी , सर्व जिल्हा, शहर कार्यकारणी सदस्य, नगरसेवक,नगरसेविका ,सर्व मोर्चाचे पदाधिकारी , सर्व शक्तिकेंद्र प्रमुख,बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


