सावंतवाडी: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य बुद्धिबळ स्पर्धा २२ जून २०२५ रोजी श्री. विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला) २१ वर्षांखालील मुला-मुलींसाठी भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, दि. २२ जून रोजी सकाळी ९:३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वतः विकासभाई सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमांनुसार स्विस लीग राउंड पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाईल. स्पर्धेदरम्यान त्याचे नियम आणि वेळापत्रक जाहीर केले जाईल. या स्पर्धेत एकूण १६ बक्षिसे दिली जाणार आहेत, ज्यात १४ गटांतील आणि २ विशेष बक्षिसांचा समावेश आहे. नामदार भाईसाहेब सेवा प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजन करत असून मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने युवा खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सावंतवाडीत उद्या विकासभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बुद्धिबळ स्पर्धा !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


