बांदा : नियमित योगा केल्याने अनेक शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. योग केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगा करून आपली शारीरिक व मानसिक स्वास्थ तंदुरुस्त राखावे असे आवाहन पतंजली योग समितीच्या योगशिक्षिका सौ. दिव्या चव्हाण यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शन देखील मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, महिला संचालिका स्वप्निता सावंत, अनंत भाटे, अंकुश माजगावकर, अभिजीत पोरे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, लिपिक ओंकार राऊळ, अमिता परब आदी उपस्थित होते.
योगशिक्षिका सौ चव्हाण यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच नियमित योगासनांचे काय फायदे आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात योग दिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना अध्यक्ष एस. आर. सावंत. सोबत योगशिक्षिका सौ. दिव्या चव्हाण व इतर.
नियमित योगा केल्याने शारीरिक, मानसिक आरोग्य तंदुरुस्त.! : योगशिक्षिका दिव्या चव्हाण. ; नट वाचनालयात जागतिक योग दिन साजरा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


