Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी प्रदीप शिंदे यांची निवड.

कुडाळ : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कुडाळ तालुका शाखा अध्यक्षपदी माजी मुख्याध्यापक प्रदीप दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कुडाळ तालुका शाखेच्या पुनर्बाधणीसाठी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात रविवार दिनांक २२ जून रोजी सभा संपन्न झाली. त्यावेळी कुडाळ तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार कुडाळ तालुक्याची पुनर्बाधणी करण्यासाठीची बैठक संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष श्री. सीताराम कुडतरकर, संघटक श्री.विष्णुप्रसाद दळवी, सचिव श्री.संदेश तुळसणकर, सहसंघटक श्रीम. रिमा भोसले, सहसचिव श्रीम. सुगंधा देवरुखकर, सल्लागार श्री. नंदकिशोर साळसकर, कुडाळचे माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला संदेश तुळसणकर, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, रिमा भोसले, विष्णुप्रसाद दळवी
यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी ग्राहक चळवळीची आवश्यकता आणि त्या अनुषंगाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे कार्य याविषयी माहिती दिली.

ग्राहकांना आपले हक्क, अधिकारी माहीत असणे खूप गरजेचे आहेत. त्यासाठी ग्राहक पंचायतने सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी तालुकावार शाखा पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांनी सांगितले. संवाद समन्वयातून ग्राहक कल्याण साधण्याचे काम ग्राहक पंचायत करीत आहे. ग्राहकांचे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी तालुका शाखानी काम केले पाहिजे. तालुका शाखा सक्षम झाली तर जिल्हा सक्षम होईल, जिल्हा सक्षम झाला तर विभाग आणि राज्य संस्था सक्षम होईल. म्हणून आपली तालुका शाखा सक्षम करा. गाव तेथे संस्थेचा कार्यकर्ता उभा करा, स्थानिक ग्राहकांना न्याय द्या, त्यांचे प्रश्न सोडवा, त्यांना ग्राहक चळवळीशी जोडून घ्या, असे आवाहन प्रा. एस. एन. पाटील यांनी यावेळी केले. त्यांनतर सर्वसंमतीने कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली.

नूतन कार्यकारिणी अशी – 
अध्यक्ष– प्रदीप दत्तात्रय शिंदे, उपाध्यक्ष- सुदाम दत्ताराम राणे, सचिव- प्रा. अजित महादेव कानशिडे, सहसचिव- वसंत महादेव कदम, संघटक- प्रा. नितीन साबाजी बांबर्डेकर, सह संघटक– नरेंद्र भालचंद्र गवंडे, प्रसिद्धी प्रमुख- निलेश अशोक जोशी, कोषाध्यक्ष- प्रा. अरुण आत्माराम मर्गज, सदस्य- पांडुरंग जयराम तोरसकर, सल्लागार- आनंद नारायण मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष प्रदीप शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नुतन अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी ग्राहक जनजागृतीचे काम जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका शाखा पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्राधान्याने हाती घेणार असल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक आनंद मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव संदेश तुळसणकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles