रत्नागिरी : बौद्धजन पंचायतन समितीच्या वतीने रत्नागिरीत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम प्रमुख वक्ते म्हणून स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे अधिव्याख्याता प्रा. सुनील जोपळे उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी यशस्वी विदयार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी डॉ. भक्ती सावंत (एम.डी.,आयुर्वेदा) यांचाही गुणगौरव ,सत्कार सौ. स्वप्नल सुनील जोपळे यांच्या हस्ते करण्यात आला.
.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असलेले प्रा. सुनील जोपळे (रत्नागिरी जिल्हाध्यक्ष –
OFROT संघटना) यांनी दहावी व बारावीनंतर किंवा पदवीनंतर ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला माझा स्पंदन जोपळे, सौ. स्वप्नल जोपळे, OFROT संघटनेचे रत्नागिरी जिल्हा कार्यअध्यक्ष लुकमन तडवी, विलास गोरे (प्राथमिक शिक्षक), प्रकाश कदम (प्राथमिक शिक्षक) व डी. एड. चे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह विद्यार्थी व समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थिनी विद्यार्था प्रविण भोये, मेघा महाले, दिक्षा भारसट, अक्षता भोये, अंकुश इंपाळ, तुषार लहारे, अजय भोये उपस्थित होते. प्रवीण भोये यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादरीकरण करण्यात मदत केली. अंकुश इंपाळ व स्पंदन जोपळे यांनी संपूर्ण कार्यकमाचे फोटो व कार्यक्रमाचे रेकॉर्डीग करण्याची जबाबदारीर पार पाडली.


