Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पारपोली प्राथमिक शाळासह देवसू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण ! ; पारपोली ग्रामविकास मंडळाचे सहकार्य.

सावंतवाडी : देवसूसह ओवळीये आणि पारपोली या तीन गावचे देवसू माध्यमिक विद्यालय आहे. या हायस्कूलसह पारपोली प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी पारपोली ग्रामविकास मंडळा (मुंबई) च्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मंडळाचे सरचिटणीस गोपाळ गावकर यांनी दिली.
पारपोली ग्रामविकास मंडळाच्यावतीने पारपोली प्राथमिक शाळा आणि देवसू माध्यमिक विद्यालय देवसू येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी गोपाळ गावकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम, खजिनदार रामचंद्र गावकर, प्रतीक गावकर, महेश गावकर, संकेत सावंत, सुरज कलांगण, झिपाजी परब, वासुदेव परब, समीर गावकर, पांडुरंग गावकर, संकेत परब, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, मनिष परब, प्रमोद परब, अरुण गावकर, गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ लवू सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब, सचिव मोहन गवस, संचालक विठ्ठल सावंत, अविनाश सावंत, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पाटील, पारपोली प्राथमिक शाळेचे शिक्षक सुभाष सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. लवू सावंत यांनी मुंबईत राहूनही पारपोली ग्रामस्थांचे पारपोली ग्रामविकास मुंबई मंडळ गोपाळ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारपोली गावाच्या शैक्षणिक धार्मिक व सामाजिक कार्यात गेली २५ वर्षे योगदान देत असून मंडळाची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पारपोलीतील गोपाळ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले २५ वर्षे हे मुंबईस्थित ग्रामस्थांचे मंडळ विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे. गेली २५ वर्षे पारपोली प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय देवसु या ठिकाणी या मंडळाकडून विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय उपयोगी साहित्य देण्यात येते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम व इतर पदाधिकाऱ्यांनी पारपोली प्राथमिक शाळा तसेच देवसू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद असल्याचे सांगून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही आभार मानले. देवसू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी दिव्या भगवान वरक हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल तसेच एन. एम. एस. मध्ये शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles