Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मोठी बातमी – लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कूलला ठोकलं टाळं! ; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत.

लातूर : नारायणा इ -टेक्नो स्कूलला शिक्षण विभागाने सिल केल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे येथील शाळेच्या प्रिन्सिपलने पळ काढला असून उद्यापासून शाळा बंद राहणार आहे. त्यामुळे, या शाळेत प्रवेशासाठी लाखोंची फीस देणारे पालक चिंतेत आहेत. नारायणा इ-टेक्नो स्कूलच्या देशभरामध्ये ब्रांचेस आहेत. मागील दोन वर्षांपासून लातूर शहरातील विना परवाना सुरू असलेल्या नारायणा इ टेक्नो स्कूलला आज शिक्षण विभागाने सील केले. याबाबत कारवाई करण्यापूर्वी शिक्षण विभागाचे कर्मचारी पोलिस कर्मचारी शाळेत दाखल झाले होते. शाळेला सील करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या शाळेच्या प्रिन्सिपलने तिथून काढता पाय घेतला.

लातूर शहरात मागील दोन वर्षापासून सुरू असलेली नारायण इ-टेक्नो स्कूल ही विनापरवाना अनधिकृत असलेली शाळा चालू असल्याबाबत वेळोवेळी शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. पालकांनी आणि त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना आणि पक्षांनी शाळेसमोर आंदोलन देखील केली होती. परवानगी नसताना शाळा सुरू केली, यामुळे शाळा तात्काळ बंद करावी जितके दिवस शाळा चालू असेल तितका आर्थिक दंड द्यावा अशा स्वरूपाची कारवाई शिक्षण विभागाने केली होती. मात्र, दंडाची रक्कम असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता नारायण इ टेक्नो स्कूल मार्फत होत नव्हती. त्यामुळे, शिक्षण विभागाने आज शाळेला सील ठोकण्याची कारवाई केल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिक्षण विभागातील कर्मचारी पोलीस, कर्मचारी आज दिवसभराची शाळा झाल्यानंतर शाळेत दाखल झाले. सर्व विद्यार्थी शाळेतून बाहेर गेल्यानंतर शाळेवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संपूर्ण शाळा आणि त्यातील वर्ग खोल्या यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं आहे. याबाबत शाळेच्या प्रिन्सिपल यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर प्रिन्सिपल यांनी शाळेतून धूम ठोकली. तर, शाळेतील कर्मचारी या सर्व प्रकारामुळे अचिंबित झाले आहेत.

पालक चिंतेत, काय म्हणाले शिक्षणाधिकारी?

शिक्षण विभागाने या शाळेला वेळोवेळी नोटीसा दिल्या आहेत. आर्थिक दंड आकारण्यात आला असताना सुद्धा शाळा प्रशासन मनमानी करत होतं. पालकांकडून लाखो रुपयांची फीस घेण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून ही शाळा बंद असणार आहे, त्यामुळे आता पालकांना लक्षात येत नाही काय करावे. काही कालावधी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्याबाबतची प्रक्रिया शिक्षण विभाग करेल, असे संकेतही शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. आम्ही वेळोवेळी शाळा प्रशासनाला नोटिसा दिल्या, माहिती दिली, तुमची परवानगी नसताना शाळा चालू ठेवणे बेकायदेशीर असल्याची सूचनाही केली. पत्र दिली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी शेख यांनी दिली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles