सावंतवाडी : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्याचे अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आज २६ जून रोजी भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथील फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले.


अमली पदार्थांना ‘Say No’ अर्थात ‘नाही’ हेच उत्तर असून कोणत्याही परिस्थितीत अशा पदार्थांच्या आहारी जाऊ नये. व्यायाम करणे, अभ्यास, वाचन, खेळ इत्यादी छंद जोपासावेत. आपण सजग विद्यार्थी म्हणून आजूबाजूला व समाजात जास्तीत जास्त जागृती करावी अशाप्रकारे विचार प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या आहारी न जाता जास्तीत जास्त जनजागृती करणे बाबत शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण तसेच शहरातील एसपीके कॉलेज, आरपीडी कॉलेज, भोसले पॉलिटेक्निक कॉलेजमधील एकूण २५० विद्यार्थी व अध्यापक वर्ग उपस्थित होते.
ADVT –


