Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात?

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणासाठी डोकेदुखी ठरलेल दिनांक १५/३/२०२४ चे जाचक संचमान्यता परिपत्रक यामुळे दोडामार्ग तालुक्यातील सोळा माध्यमिक शाळांतील सहा शाळा शुन्य व एक शिक्षकी शाळा ठरल्या असुन फक्त भेडशी व दोडामार्ग या दोन शाळांमध्ये शिक्षक पदे मंजूर असून ती भरायला मिळत नाहीत, शाळांमध्ये अपुर्या शिक्षक संख्येचा फटका शाळांना बसला असून ,विद्यार्थी गोव्यातील शाळांमध्ये दाखल झाले आहेत ..
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, उपाध्यक्ष विश्वनाथ सावंत,सचिव विजय मयेकर, पांडुरंग तळणकर,अजय सावंत, अंकुश मिरकर,हनुमंत सावंत,प्रशांत चव्हाण , सहसचिव भाऊसाहेब चवरे,संजय शेवाळे व दोडामार्ग तालुका माध्यमिक अध्यापक संघांचे तालुका अध्यक्ष आनंदा बामणीकर,सचिव संतोष मेथे, उपाध्यक्ष राजाराम फर्जंद यांच्या शिष्टमंडळाने रविवार दिनांक २२/६/२०२५ रोजी तालुका आढावा बैठक घेतली त्यात धक्कादायक माहिती समोर आली..
गोव्याहून रुग्णांना घेण्यासाठी येणारी रुग्णवाहिका रस्त्यावर थांबते तर शिक्षणासाठी मुलांना न्यायला येणारा बालरथ घराच्या दारात येऊन उभा रहातो…
दोडामार्ग तालुका राज्याचा सर्वात शेवटचा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे. तालुक्यातील बहुतांश लोकांना उपजिविकेसाठी गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे…
दोडामार्ग तालुक्याच्या सीमेस लागून गोवा शासनाच्या जवळपास 13 शाळा आहेत. या शाळांमध्ये दोडामार्ग तालुक्यातून बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे अस्तित्वच धोक्यात येत आहे… कळण्यापासून आयीपर्यंत चार माध्यमिक शाळा व जवळपास 20 पेक्षा अधिक प्राथमिक शाळा सध्या विद्यार्थ्यांअभावी ओस पडत चालल्या आहेत…
यामागील अनेक कारणे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाचे शिक्षण म्हणजेच सर्वोत्कृष्ट शिक्षण असा पालकांचा झालेला गैरसमज. गोव्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्यामुळे दिवसभर सुट्टी मिळते या कारणानेही विद्यार्थी गोव्यात शाळांमध्ये प्रवेश घेत आहे. तसेच विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी गोवा सरकारमार्फत बालरथही पुरवले आहेत त्यामुळे हे बालरथ प्रत्येक विद्यार्थ्याच्या दारात जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जातात. शासनाचे महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांकडे वारंवार होत असलेले दुर्लक्ष हेही याचं मुख्य कारण आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षात रिक्त पदे भरपूर झाली मात्र त्या प्रमाणात भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळे शिक्षक संख्या शाळांमध्ये कमी दिसत आहे याचाही फटका काही माध्यमिक शाळांना बसताना दिसतो…
१५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार तालुक्यातील जवळपास सहा शाळा शून्य शिक्षकी तर उरलेल्यापैकी बहुतांशी शाळांमध्ये तीन ते चार शिक्षक मंजूर झाले आहेत. सध्या या संचमान्यतेला स्टे असला तरी भविष्यात मोठा धोका निर्माण झाला आहे…
शाळांमध्ये कला, क्रीडा व संगीत या विषयाच्या शिक्षकांची वानवाच आहे. अशी पदे विद्यार्थ्यांच्या संख्येवर ठेवल्यामुळे तालुक्यातील एकाही शाळेत नवीन कला क्रीडा व संगीत या विषयाचा शिक्षक मिळणार नाही… एकीकडे आपण ऑलम्पिक मध्ये 100 पदके मिळवण्याची अपेक्षा करतोय आणि त्यासाठी प्रशिक्षण देणारा शिक्षकच शाळेत नसल्यावर विद्यार्थ्यांमध्ये असे कलागुण कसे वाढीस लागतील?
हा ही एक प्रश्नच आहे…
शाळेत शिक्षक कमी असतील तर आम्ही मुलांना कसं पाठवायचं असाही पालकांचा समज झालेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी, NEET, JEE अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी चमकताना दिसत आहेत मात्र त्याचा नवीन प्रवेश प्रक्रियेवर काही परिणाम होताना दिसत नाही. काही सुज्ञ पालक मात्र आपली मुले जिल्हा परिषद व मराठी माध्यमांच्या माध्यमिक शाळांमध्ये घालताना दिसत आहे त्यांचा मराठी माध्यमांच्या शाळांवर विश्वास आहे…
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ व दोडामार्ग तालुका माध्यमिक अध्यापक संघाने केलेल्या संशोधनानुसार फक्त दोडामार्ग शहरातून जवळपास 200 पेक्षा अधिक विद्यार्थी हे गोव्यात व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच वातावरण पुढे राहिलं तर भविष्यात दोडामार्ग तालुक्यात एकही माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा अस्तित्वात दिसणार नाही. याचा परिणाम तालुक्याच्या पुढील पिढीच्या भविष्यावर नक्की होईल. त्याला फक्त पालक जबाबदार आहे असं नसून यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक ही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत कारण त्यांची मुले ही इंग्रजी माध्यम व गोव्यामध्ये शिक्षण घेत आहेत. काही शिक्षकांचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे यातून दिसून येत आहे का?
त्यामुळे काही पालक असा विचार करतात की जर शिक्षकांची मुले जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये शिकत नसतील तर आम्ही आमची मुले मराठी माध्यमांच्या शाळेत का घालावी? आणि याचाच परिणाम म्हणून पुढील काही वर्षात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा तालुक्यात दिसणारच नाहीत की काय? असा प्रश्न भविष्याच्या समोर उभा ठाकला आहे..
या सर्वाचा राज्य शासनाने , सर्व गोष्टींचा विचार करून यावर वेळेत काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे…
अन्यथा दोडामार्गातील भावी पिढीला व ज्यांची इंग्रजी माध्यम किंवा गोव्यात जाऊन शिक्षण घेण्याची ऐपत नाही अशा मुलांना शिक्षणाची संधीच मिळणार नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles