Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

महालक्ष्मी कंपनीची वीज कायमस्वरूपी द्यावी ! : दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांची अधीक्षक अभियंताकडे मागणी. ; वीज ग्राहक संघटनेच्या आवाहनाला त्रस्त वीज ग्राहकांचा उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद!

दोडामार्ग : महाराष्ट्र शासनातर्फे गेले ३ वर्ष अद्यापही महालक्ष्मी कंपनीचा करार न केल्यामुळे कायमस्वरूपी विद्युत पुरवठा मिळत नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात कोनाळ येथे निर्मित असलेला महालक्ष्मी कंपनीचा वीजपुरवठा महाराष्ट्र शासनाने करार करून कायमस्वरूपी द्यावा, अशी मागणी दोडामार्ग वीज ग्राहकांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याकडे केली आहे. या बैठकीला दोडामार्ग तालुक्यातील १५० पेक्षा जास्त त्रस्त वीज ग्राहकांची उपस्थिती होती. वीज ग्राहक संघटनेच्या आवाहनाला ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला.


सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग वीज ग्राहक संघटना आयोजित दोडामार्ग वीज कार्यालयात तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या व विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वीज ग्राहक संघटनेच्या वतीने दोडामार्ग अभियंता श्री.हतरंगी यांना आवाहन करून वीज ग्राहकांच्या वैयक्तिक समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला. तब्बल दीड तास नियोजित वीज ग्राहकांच्या समस्या लेखी स्वरूपात तक्रार अर्ज स्वीकारण्यात आले. त्यांच्या काही भागात वीज समस्या आहेत त्या वीज विभागाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन वीज ग्राहकांना देण्यात आले. तसेच वैयक्तिक तक्रारी वीज ग्राहकांच्या वीज विभागाने नोंद करून घेतल्या.
इन्सुली येथून दोडामार्ग तालुक्यात 33 केवी लाईनद्वारे जंगलमय भागातून विद्युत पुरवठा करण्यात येतो मात्र गेले अनेक वर्ष ह्या जुन्या लाईन असल्या कारणाने झाडाच्या फांद्या पडून दोडामार्ग तालुक्यातील विद्युत पुरवठा हा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे अनेक वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या समस्येला तोडगा काढण्यासाठी दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेने 20 जून रोजी कुडाळ येथे झालेल्या बैठकीत अधीक्षक अभियंता श्री.राख यांच्याकडे कोनाळ येथे दोडामार्ग तालुक्यात निर्मित असलेल्या महालक्ष्मी कंपनीचा सद्यस्थितीत तात्पुरता वीजपुरवठा करण्यात येतो हाच वीज पुरवठा दोडामार्ग तालुक्यात कायमस्वरूपी करावा अशी मागणी 20 जूनच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार दोडामार्ग वीज कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा वीज ग्राहक संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी महालक्ष्मी कंपनीद्वारे दोडामार्ग तालुका वासियांना कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली त्याला उपस्थित ग्राहकाने उदंड असा प्रतिसाद दिला.
कुडासे गावातील वीज ग्राहक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले काही दिवस सातत्याने कुडासे गावामध्ये वीज समस्या होत असल्याकारणाने जीर्णविद्युत वाहिन्या तथा जीर्णविद्युत खांब त्यावर वाढलेली झाडेझुडपे असल्या कारणाने अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी समस्येचे निरसन व्हावे अशी मागणी कुडासे ग्रामस्थांनी केली. यावेळी दोडामार्ग अभियंता श्री हतरंगी यांनी तात्काळ या समस्या निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता श्री‌.राख वीज ग्राहकांना संबोधित करताना म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील समस्या आपण जाणून घेतल्या असून महालक्ष्मी कंपनीकडून सातत्याने वीज पुरवठा दोडामार्ग वासियांना मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून वीज ग्राहकांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे वचन वीज ग्राहक संघटनेला त्यांनी दिले आहे. तसेच दोडामार्ग वीज ग्राहक संघटनाद्वारे विविध लेखी स्वरूपात आपल्याकडे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता आपण करू असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, अधीक्षक अभियंता श्री.राख, अभियंता श्री.वनमारे, दोडामार्ग अभियंता श्री.हतरंगी, सहाय्यक अभियंता पराग शिरधनकर, वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष संजय गवस व संतोष नानचे, एकनाथ नाडकर्णी रमेश दळवी, दोडामार्ग व्यापारी अध्यक्ष सागर शिरसाठ, सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, उद्योजक रविकिरण गवस, गणेशप्रसाद गवस, विनिता घाडी, कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे, संतोष पटकारे, सदाशिव गवस, नवनाथ गवस, राजाराम गावडे, राजेश पाटील, सुनील गवस, राजाराम देसाई, सुगंध नरसुले,सौ. पूजा देसाई, अशोक सावंत, संतोष राऊळ, प्रसाद कुडास्कर, चंद्रकांत राऊळ, किशोर देसाई, हरी देसाई, राजेश देसाई, शेखर बोर्डेकर, नंदराज शेटे, नरेश गवस, सत्यवान देसाई, सौ‌.सरिता पिळगावकर, रवी पिळगावकर, ओंकार रेडकर, अनिकेत परब, प्रदीप सावंत, वसंत गवस, संतोष देसाई, वैभव गवस, संजय नाईक, विनोद शेटये, विलास देसाई, प्रवीण गवस, संतोष अहिर, राजेश फुलारी, काशिनाथ राऊळ, चेतन चव्हाण, पराशर सावंत, दीपक गवस, देवेंद्र शेटकर, आनंद तळणकर, सुधीर दळवी, अजित देसाई, सुरेंद्र सावंत, सूर्यकांत गवस, भगवान गवस, गुरु सावंत, समीर रेडकर, समिर शिंदे उपस्थित होते

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles