अकोला : अकोल्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गे-डेटिंग’ ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ‘गे-डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून एका बँक अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, अकोल्यासह संपूर्ण राज्यात ‘गे-डेटिंग’ ॲप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनला आहे. या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत. अशाच एका ‘गे-डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपींनी या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवलं होतं. तिथे चार आरोपींनी या अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. कालांतराने या बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत पीडित अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी घटेनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि त्यावरुन ब्लॅकमेल करत माझ्याकडून आधी 30 हजार रुपये घेतले आणि त्यानंतर काही दिवसांनी आणखी पैसे मागितले. आरोपींनी माझ्याकडून आतापर्यंत 79 हजार 300 रुपये घेतले आहेत.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांपैकी दोघांना पकडण्यात आले आहे. मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सध्या इतर आरोपींचाही शोध सुरु आहे. आता पोलिस या आरोपींना इतरही लोकांची फसवणूक केली आहे का याबाबत चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक या आरोपीकडे एक इंजेक्शन होते. हा भेटण्यासाठी आलेल्या लोकांना इंजेक्शन द्यायचा, त्यामुळे त्यांच्यात उत्तेजना निर्माण व्हायची. त्यानंतर हे पीडितांवर अत्याचार करायचे व ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळायचे.