बीजिंग : पृथ्वीवर आतापर्यंत अनेक चमत्कार घडलेले आहेत. यातील काही चमत्कारांचं गूढ तर अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे संशोधक काही रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजूनही काही चमत्कारांची उकल झालेली नाही.

(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
पृथ्वीतलावर असाच एक अजब माणूस होऊन गेला आहे. त्याचं वय तब्बल 256 वर्षे होतं. चीनमध्ये असा एक चमत्कारिक माणूस होऊन गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे नाव ली चिंग-युन असे होते. त्यांचा जन्म 3 मे 1677 रोजी झाला होता. तर त्यांचे निधन 6 मे 1933 रोजी झाले होते. (ली चिंग-युन यांचा फोटो)
ते एक चिनी हर्बलिस्ट, मार्शल आर्टिस्ट होते. ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत माझा जन्म 1736 साली झाला असावा, असे सांगायचे. पण उपलब्ध असलेल्या रेकॉर्ड्सनुसार त्यांचा जन्म 1677 साली झाला होता. या दोन्ही तारखा ग्राह्य धरल्या तर ली चिंग-युन यांचे वय अनुक्रमे 197 आणि 256 वर्षे होते.

त्यांनी आपल्या आयुष्याचा बहुसंख्य काळ हा डोंगराळ भागात घालवला. ते जवणात फक्त जंगलातील वनस्पती आणि भात खायचे. त्यांनी लष्करातही काम केलं होतं. वयाच्या 78 व्या वर्षी ते निवृत्त झाले होते. त्यांनी एकूण 24 लग्न केल्याचे बोलले जाते. तील 23 पत्नींचा मृत्यू ली चिंग-युन हयात असतानाच झाला होता. या 24 पत्नींपासून त्यांना तब्बल 200 मुलं होती, असे बोलले जाते.