Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

भोसले फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ‘जीपॅट व नायपर’ परीक्षेत यशाचा डंका ! ; मिळणार राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्चशिक्षण व संशोधनाची संधी.

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट व नायपर २०२५ परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व ऑल इंडिया रँकिंग पुढीलप्रमाणे : सानिका गावडे १२८०, जान्हवी बगळे – एम.टेक १८९२, एम.फार्म २०३५, गौरी धुरी २१५४, अनिषा निरवणे २६२२, गायत्री नाटेकर ३१३४, सुरेश चौधरी ३६१८, काजल कोठावळे ५१७१

जीपॅट ही एम.फार्मसी प्रवेशासाठी लागणारी पात्रता परीक्षा आहे. नायपर ही त्या पुढील पायरी असून, देशातील सर्वोत्तम फार्मसी संस्थांमध्ये शिकण्याची संधी देते. सोबतच शासकीय शिष्यवृत्ती सुद्धा उपलब्ध होते. यामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील उच्चशिक्षण, संशोधन व करिअरचे दार उघडते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.विजय जगताप, ॲस्पायर क्लबचे समन्वयक प्रा.मयूरेश रेडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ADVT –

खुशखबर ! – आता इंजिनिअरिंग व फार्मसी शिक्षणाची चिंता सोडा ! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे येथे प्रवेश घ्या आणि उत्तम करिअर घडवा !

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles