कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी सोमवार दी ३० जुन २०२५ रोजी महाविद्यालयात आयोजीत रक्तदान शिबिराच्या वेळी देहदानाचा संकल्प केला, तसा फॉर्म भरून त्यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याकडे सुपूर्द केला.
सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संघटना रक्तदान,अवयवदान व देहदान हे महान कार्य अविरतपणे करत असून त्यासाठी समाजात सतत जनजागृती करत असते.तसेच जिल्ह्यात त्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करत असते. यातूनच प्रेरणा घेऊन प्राचार्य डॉ.स्मिता सर्वसे यांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आपला देहदानाचा निर्णय येथील आयोजीत कार्यक्रमात सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे सस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वय संजय पिळणकर, कुडाळ – वेंगुर्ला विभागीय संघटक यशवंत गावडे, डॉ. कॅप्टन एस. टी. आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.भावेश चव्हाण यांनी केले.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांचा देहदानाचा संकल्प ! ; सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचा पुढाकार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


