सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया पराग चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवगड येथील दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार तिचे वडील विलास तावडे यांनी आज पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणाली माने व तिचा मुलगा दोघे (रा. देवगड) असे त्या दोघांचे नाव आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहे.


