Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

CRIME – बनावट आरसीने महागड्या गाड्यांची विक्री! ; चिपळूण, रत्नागिरी, बीड येथील सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश!

कोल्हापूर : बनावट आरसी आणि खोट्या टीटी फॉर्मवर सह्या करून लाखो रुपयांच्या महागड्या कारची परस्पर विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश शाहूपुरी पोलिसांनी केला आहे. यामध्ये चिपळूण, रत्नागिरी, बीड, ठाणे आणि मुंबईतील आरोपींचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ५९ लाख ७० हजार रुपयांच्या तीन महागड्या कार जप्त केल्या आहेत.
टेंबलाईवाडी (ता. करवीर) परिसरातील जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ही फसवणूक उघडकीस आली. आरोपींनी दोन क्रेटा आणि एक फॉर्च्युनर गाडीच्या मूळ मालकांची बनावट आरसी तयार केली आणि टीटी फॉर्मवर खोट्या सह्या करून या गाड्या परस्पर विकल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे व्यवहार झाले असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये एक संगठित फसवणूक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नीलेश रामचंद्र सुर्वे (३३, रा. खेर्डी, शिवाजीनगर, चिपळूण), हसन मगदूम जहागीरदार (३१, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी), मोहम्मद अमजद मोहम्मद अहसान कुरेशी (४३, रा. बेहराम बाग, जोगेश्वरी, मुंबई), सकिब सलीम शेख (२९, रा. महापोली, भिवंडी), शहजामा खान बदरुजमा खान (३६, रा. जुना बाजार, बीड) आणि शेख शाहनवाज शेख आसेफ (४५, रा. नगर रोड, बीड) यांचा समावेश आहे.
या आरोपींपैकी काहीजण आरटीओ एजंट आणि फोटो स्टुडिओ चालवणारे असून त्यांनी बनावट कागदपत्रांची छपाई, खोटी सही, बनावट आरसी तयार करणे, गाडीचा व्यवहार ठरवणे आणि खरेदीदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाटून घेतली होती. हे सर्वजण संगनमत करून महागड्या गाड्यांच्या व्यवहारातून लाखोंची फसवणूक करत होते.
शाहूपुरी पोलिसांनी या कारवाईनंतर स्वतंत्र तपास पथक तयार करून अधिक चौकशी सुरू केली आहे. या रॅकेटचा अड्डा मुंबई, बीड आणि ठाणे परिसरात असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आणि आरटीओ कार्यालयातील अंतर्गत सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles