Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

“आमच्या वेंगुर्ल्याच्या पोरानं नाव कमावल्यानं !” : कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष, यशस्वी उद्योजक मोहन होडावडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड. नकुल पार्सेकर यांच्या शब्दमय शुभकामना!

मोहन होडावडेकर…

एका सामान्य कुंटुबातील अतिशय सामान्य मुलगा पण असामान्य बुद्धिमत्ता असलेला क्रिएटिव्ह माणूस. पदवीधर आणि आवड म्हणून पञकारितेची परिक्षा चांगल्या मार्काने पास झालेला.
साधारण तीस वर्षांपूर्वी मालवणी खाजे, कडक बु़दीचे लाडू, मसाल्याचे पदार्थ विकण्यासाठी मुंबईत मालवणी जञेत जातो काय आणि या मुलावर लक्ष जाताच त्याच्याशी मा. सुरेशजी प्रभू संवाद साधतात काय… आणि प्रभू साहेबांच्या पहिल्या निवडणूकीत साहेब खासदार झाल्यावर त्यांचा या जिल्ह्यातील स्वीय सचीव म्हणून काम करायला सुरुवात करतो काय… आणि हा हा म्हणता एक प्रगतशील आणि खऱ्या अर्थाने बेरोजगारांना रोजगार देणारा उद्योजक बनतो काय… सर्वच प्रवास विलक्षण आणि कौतुकास्पद.


डोक्यात नुसत्या संकल्पना आणि तोंडाच्या बाता मारून चालत नाही तर त्या संकल्पनाना, स्वप्नाना सत्यात उतरण्यासाठी सातत्याने कष्टाची जोड द्यावी लागते. सनदीअधिकाऱ्यांना जे जमणार नाही ते मोहन करू शकतो. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी लाखो रुपये घेतले जातात पण हा साधा पदवीधर असलेला मोहन फक्त थिम सांगितली की असा प्रकल्प अहवाल तयार करतो की, तो प्रकल्प अहवाल नाकारायची स़बधितांची काय बिशाद?
मुंबई, पुण्या सारख्या महानगरात जर या माणसाने एखादी फर्म घातली असती तर कोट्यवधी रूपये कमावले असते.
बांबू या दुर्लक्षित वनस्पतीला जगाच्या नकाशावर आणण्याचे काम करणारा मोहन खऱ्या अर्थाने कोकणातील कुरीअन आहे.
मा. सुरेश प्रभू यांच्यामुळे माझ्या संपर्कात हा हिरा आला आणि मोहन कडुन खूप काही शिकता आले. तसं पाहिलं तर मोहन अतिशय शांत संयमी आणि मी आक्रमक पण एखाद्या बाबतीत जर आक्रमकपणा दाखवायचा असेल तर ती पण त्याची तयारी असते. हे अनेकदा मी अनुभवले. व्यवसाय सांभाळून सामाजिक कामातही सतत अग्रेसर, वेळेचे योग्य नियोजन आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बरोबर एखाद्या विषयावर बैठकीला जाताना परिपूर्ण होमवर्क ही मोहनची खासियत.


गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ आम्ही एकञ आहोत. मोहनला झाडांची आवड असल्याने आणि माझ्या सौभाग्यवतींचा झाडे, बाग बगिचा हा अतिशय आवडीचा विषय असल्याने घरी आल्यावर इतर विषयांपेक्षा झाडावरचं जास्त चर्चा असते. काही सामाजिक संस्थावर एकञ काम करत असताना अनेक गोष्टी या माणसा कडून शिकता येतात. मोहनमध्ये आणि माझ्यात एक दुसरा साधर्म्य असलेला गुण म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय काटेकोरपणे झाले पाहिजे.


मा. सुरेशजी प्रभू व सौ. उमा वहिनी यांचा विश्वासू शिलेदार, जन शिक्षण सिंधुदुर्गचा अध्यक्ष, चिवारचा संचालक, काॅनबॅकचा संचालक, माझा वेंगुर्लाचा स्वयंसेलक आणि ज्या कुडाळच्या औद्योगिक वसाहतीने आज कात टाकली आहे त्या कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचा अध्यक्ष. एखाद्या टिमचा प्रमुख जर चांगला असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम कसे होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजची कुडाळ औधोगिक वसाहत.
श्री आनंद बांदिवडेकर, श्री शशिकांत चव्हाण, डॉ. नितीन पावसकर, श्री द्वारकानाथ धुरी, श्री कमलाकांत परब अशा अनेक सहकाऱ्यांनी तन, मन, धन अर्पून कुडाळ औधोगिक वसाहतीचा पाया मजबूत केला. आज याच उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल सुरु आहे.
चार वर्षापूर्वी मोहनने अध्यक्षपद स्वीकारावे असा जेव्हा या सर्व पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला तेव्हा मोहनने त्यांच्या समोर एक अट ठेवली की नकुल पार्सेकर यांना जर कार्यवाह म्हणून मान्यता देत असाल तर मी ही जबाबदारी स्विकारतो. मोहन माझ्याशी बोलला मी माझ्या इतर जबाबदाऱ्या विचारात घेता नकार देऊन बघितला पण मोहनची इच्छा मला टाळता आली नाही.


मी अनेक संस्थावर काम केले, करत आहे पण कुडाळ MIDC असोसिएशनच्या सर्व टिममध्ये जो एक भावनिक बंध निर्माण झालेला आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एक कुटुंब म्हणून जे आम्ही काम करत आहोत त्याचे कुटुंब प्रमुख म्हणून सर्व श्रेय मोहनला जाते.
अशा या अष्टपैलू आणि एका चालत्या बोलत्या फार न शिकलेल्या विद्यापीठाचा आमच्या कौटुंबिक मिञाचा आठ जुलै रोजी वाढदिवस. आमच्या सर्व सामाजिक संस्था, कुडाळ MIDC असोसिएशन आणि स्नेहप्रिया परिवाराकडून माझ्या या कर्तृत्ववान प्राणप्रिय मित्राला वाढदिवसाच्या उदंड, उदंड शुभेच्छा!!!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles