सावंतवाडी : सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेतील सेवक व संचालक यांना प्रशिक्षित करण्यासाठी सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाची शासनमान्य शिखर प्रशिक्षण संस्था,दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्र, विद्यानगर कराड तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा सावंतवाडी येथील सभागृहात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व सेवक सहकारी पतसंस्थेतील सेवक व संचालक यांना सक्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शक एसआरओ एम आर फर्नांडिस यांनी बिनचूक थकीत कर्ज वसुली प्रक्रियेसाठी घ्यावयाची दक्षता व सहकारी कायद्यातील कायदेशीर तरतुदी तसेच नवीन लेखापरीक्षण निकष व वर्गवारी,एनपीएचे बदलते निकष व व्यवसाय वृद्धी या विषयावर मार्गदर्शन केले.प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख शिंदे यांनी सहकारी संस्था संचालनात सेवक,संचालक यांचे योगदान व भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी सहाय्यक निबंध क सुजय कदम यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष यानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच सहकार क्षेत्र वृद्धिंगत होण्यासाठी भविष्यातील नियोजित विविध उपक्रमांची माहिती दिली सदर प्रशिक्षणास कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक, सैनिक नागरी पतसंस्था, पंचद्रवीड नागरी पतसंस्था, जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह पतसंस्था,विद्यासेवक सहकारी पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था तसेच जिल्ह्यातील इतर पतपेढीचे संचालक सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.जिल्ह्यात सहकार चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील असलेले क्रियाशील अधिकारी सुजय कदम,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,सावंतवाडी यांचे उपस्थित प्रशिक्षणार्थींच्या वतीने विद्यासेवक पतसंस्थेचे संचालक पांडुरंग काकतकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सेवक व संचालक यांना संस्थेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


