सावंतवाडी: नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि गुरु-शिष्य परंपरा यावर विचार मांडले.
यात लहान गटातून प्रथम क्रमांक वैभवी पाटकर, द्वितीय क्रमांक मयुरेश हवालदार, तृतीय क्रमांक जिज्ञेशा भैरे त मोठ्या गटातून प्रथम क्रमांक रोहन गावडे, द्वितीय क्रमांक लावण्या राणे, तृतीय क्रमांक मनाली परब यांनी पटकावला. यावेळी नितीन धामापूरकर आणि प्राचार्या के. व्ही. बोवलेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


