Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

३ मुले जन्माला घालावी लागणार! ; ‘हा’ देश लवकरचं कठोर कायदा करणार!

जगातील अनेक देश लोकसंख्या वाढीचा दर घटल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे बहुतांशी देशांनी लोकसंख्या वाढवण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. अशातच आता 82 टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या नेपाळ देशाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत नेपाळमधील जोडप्यांना आता 3 मुले जन्माला घालावी लागणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ही घोषणा केली आहे. नेपाळ हा भारताचा शेजारील देश देखील आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नेपाळची लोकसंख्या 2.97 कोटी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून नेपाळमधील जन्मदर घटला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीसाठी सरकारने हे धोरण जाहीर केले आहे. पंतप्रधान ओली यांनी सांगितले की, ‘जर हे धोरण लागू केले नाही तर भविष्यात संकट आणखी वाढेल.’

पंतप्रधान ओली यांनी काय म्हटलं?

पुढे बोलताना पंतप्रधान ओली म्हणाले की, सरकारने 3 मुले जन्माला घालण्याचे धोरण लागू केले आहे. लोकांनी ते अंमलात आणले पाहिजे. कारण फक्त तरुणच देशाचा विकास करू शकतात. त्यामुळे आम्ही लवकरच यावर कठोर कायदा तयार करणार आहे. मानवी संस्कृतीसाठी जन्म महत्त्वाचा आहे. जर संस्कृती वाचवायची असेल तर जन्मदर वाढवण्याके लक्ष देणे गरजेचे आहे.

नेपाळच्या जन्मदरात घट –

भारताच्या शेजारील देश नेपाळची लोकसंख्या 3 कोटींच्या जवळ आहे, मात्र जन्मदर घटला आहे. 2022 मध्ये नेपाळचा जन्मदर 19.64 होता, जो 2025 मध्ये 17 पर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये नेपाळचा प्रजनन दर 2.36 होता, जो 2023 मध्ये 1.98 पर्यंत कमी झाला. यामुळे नेपाळने 3 मुलांना जन्म देण्याचे धोरण आणले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles