महामुंबईचा चमकता तारा, भाजपाचा युवा आश्वासक चेहरा! : विक्रांत पाटील.
“काय बाळासाहेब.. स्वतः जनरल बॉडी चे अध्यक्ष आणि मुलगा विद्यार्थी आघाडीचा अध्यक्ष”… असे तुमच्या भारतीय जनता पार्टीत चालते का?” प्रश्न होता पनवेल मधील एका ज्येष्ठ पत्रकाराने विचारलेला.. बाळासाहेब पाटील यांनी उत्तर दिले की, “आमच्या रायगड जिल्ह्यात भाजपाची परिस्थितीच अशी आहे की मला मंडळ अध्यक्ष करायला सुद्धा माणसे नाहीत.” त्यामुळे आम्हा बापलेकांनाच आता रायगड जिल्ह्यात पक्ष चालवावा लागेल, अशी परिस्थिती आहे..

ही घटना आहे २००३ सालची, जेव्हा विक्रांत बाळासाहेब पाटील यांची भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली होती.त्याकाळी रायगड जिल्ह्यात भाजपा ची उमेदवारी तर दूरच पण साधा पदाधिकारी म्हणून काम करायला सुद्धा कोणी तयार नव्हते अशी परिस्थिती होती.अगदी बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते आणि बाळासाहेब पाटील व विक्रांत पाटील हे दोन्ही बापलेक नेते,अशी अवस्था रायगड भाजप ची होती.आणि तीच भाजपा मोदी लाट येईपर्यंत जिवंत आणि ज्वलंत ठेवण्याचे काम या जोडीने केले होते..
२००४ ते ०९ च्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पनवेल शहरासह ग्रामीण भागात देखील लोड शेडिंग होत होती,.म्हणून विक्रांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन महावितरण कार्यालयावर मेणबत्ती मोर्चा काढला होता. व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तरी लाईट/वीज उपलब्ध व्हावी म्हणून आंदोलन केले होते..
त्याच आंदोलनापासून मी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांच्याशी जोडला गेलो ते आजपर्यंत.
विक्रांत पाटील हे एक असे व्यक्तिमत्व आहे,ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. अनेक विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न युवकांच्या अडचणी सोडवत ज्यांनी आक्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला. आणि भारतीय जनता पार्टीचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम केले.
रायगड जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष पद आल्यानंतर विक्रांत पाटील यांनी स्थानिक पातळीवरील अनेक युवकांचे संघटन उभे केले तसेच संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला युवकांच्या अनेक विषयांमध्ये काम केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला .2010 साली भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी विक्रांत पाटील यांची निवड केली .तीन वर्ष प्रचंड प्रवास करून व मेहनत घेऊन काम केल्यानंतर 2015 साली सन्माननीय पंकजाताई मुंडे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या टीम मध्ये देखील महासचिव म्हणून काम करण्याची त्यांना संधी दिली.
एवढेच नव्हे तर माहिती तंत्रज्ञान अभियंता व युवा उद्योजक असलेल्या विक्रांत पाटील यांचे नेतृत्व गुण हेरून भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी दिली.तेव्हा विक्रांत दादांनी भाजपचे विचार आणि अंत्योदयाचा प्रचार करण्यासाठी राज्यभर दौरे केले. अध्यक्ष पदाची जबाबदारी पेलून दाखवली.

सातत्यपूर्ण संघर्ष आणि प्रवास करत असताना 2014 सालच्या विधानसभा निवडणुका लागल्या.. तेव्हा आपल्या बापाच्या निष्ठेला आणि स्वतःच्या कष्टाला न्याय मिळेल म्हणून 2014 सालची मोदी लाटेतील आमदारकी बापलेकांना खुणावत असतानाच अचानक पनवेल मधील ठाकूर घराण्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला.आणि हाता तोंडाशी आलेली आमदारकी वडिलांची असो किंवा विक्रांत दादाना मिळणारी असो…थोडीशी दुरावली.तरीही बापलेकांनी निष्ठेने काम करून प्रशांत ठाकूर यांना भाजपाच्या चिन्हावर विधानसभेत पाठवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हे भाजपचे ब्रीद खरे करून दाखवले पुढे सातत्त्यपणे भारतीय जनता पार्टीचे काम एकनिष्ठतेने विक्रांत पाटील करतच राहिले.
बघता बघता 2017 साली पनवेल महानगरपालिकेचे निवडणूक लागली.तेव्हा विक्रांत पाटल यांच्या कामगिरीची दखल घेत पक्षाने पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याचे आदेश दिले,अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत विक्रांत पाटील नगरसेवक पदी निवडून आले.नंतर पक्षाने उपमहापौर पदाची जबाबदारी देऊन विक्रांत पाटील यांचे नेतृत्व आणखी कनखकर बनवले.नंतर पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महासचिव पदाची अत्यंत कमी वयात फार मोठी जबाबदारी पक्षाने विक्रम पाटील यांच्यावर सोपवली.पक्ष देईल ते काम काळ,वेळ न बघता सदा सर्वकाळ जबाबदारी निभावली.पुढे विक्रांत पाटील यांच्या या सातत्यपूर्ण कामाची,निष्ठेची व कष्टाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने सन 2024 साली राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांच्या कार्याची पोहोच पावती दिली.

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर विक्रांत पाटील यांनी लगेचच सिडकोच्या घरांच्या आवाक्याबाहेर जाणाऱ्या किमती,नैना प्राधिकरणातील नोंदणी संदर्भातील समस्या,पनवेल महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना,नवी मुंबई विमानतळ बधितांच्या समस्या आणि एमआयडीसी संदर्भात अडचणी ,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय ची गरज अशा अनेक प्रश्नांची लक्षवेधी लावून आपल्या प्रगल्भतेची चुणूक दाखवली.
विधिमंडळाच्या हिवाळी,उन्हाळी (अर्थसंकल्पीय), पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हितासाठी कायम आवाज उठवला व आपल्या अनेक मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या.
बऱ्याच लोकांना असे वाटते की विक्रांत पाटील यांना कमी वयात विधानपरिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात पक्षाने आमदार केले आहे.
परंतु त्यांच्या दोन्ही पिढ्यांनी पडत्या काळात भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठा ठेऊन केलेला संघर्ष,पक्ष कार्यासाठी दिलेला वेळ, व सर्वसामान्य जनतेचे सोडवलेले प्रश्न याची दखल घेऊन पक्षाने दिलेली पावती/जबाबदारी आहे.
विक्रांत बाळासाहेब पाटील हे केवळ एक नेते नाहीत, तर ते अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी, आणि निस्वार्थ वृत्ती यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. प्रतिकूल परिस्थितीतही संयम न गमावता धैर्याने काम करण्याची त्यांची वृत्ती अनेकांना बळ देते. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असेल आणि भविष्यातही ते असेच भरीव कार्य करत राहतील अशी अपेक्षा आहे.
आज नवी मुंबई विमानतळाच्या परिघामध्ये विस्तारत असलेल्या महामुंबई नगरातील नागरिकांच्या समस्या,तरुणांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणीसाठी सदैव झटणारा आणि उभा राहणारा आश्वासक चेहरा म्हणून विक्रांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते.व भारतीय जनता पार्टी चा देखील वेगाने विस्तारत असलेल्या महामुंबईचा युवा चेहरा म्हणून विक्रांत पाटील यांना ओळखले जाईल यात तिळमात्र शंका नाही.

असो, आज आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उज्वल भविष्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
आदरणीय आमदार विक्रांत दादा –
”झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून, यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा
वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
स्नेह तर कायमचं, वृद्धीची अभिलाषा..!”
शब्दांकन – नामदेव मुंडे, पनवेल.


