Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नेमळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ; तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत!

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी साक्षी मोहन दळवी हिने 218 गुण प्राप्त करून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त करून जिल्ह्यात सहावी तर तालुक्यातून पहिला क्रमांक मिळविला आहे. तसेच कुमार निमिश उमेश राऊळ याने 174 गुण प्राप्त करत ग्रामीण सर्वसाधारण तालुक्यात गुणवत्ता यादीत पंधरावा क्रमांक मिळविला.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार प्रज्योत प्रशांत राऊळ याने 212 गुण प्राप्त करून जिल्ह्यात ७४ वा क्रमांक प्राप्त केला तसेच तालुक्यात सोळावा क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, उपाध्यक्ष हेमंत भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडुलकर, सचिव स. पा. आळवे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के. व्ही. बोवलेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना यु. यु. राऊळ, जाधव आर के राठोड नितीन धामापूरकर नेत्रा चव्हाण के पी मयेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles